अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणार? शरद पवार स्पष्टच बोलले…

अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणार? शरद पवार स्पष्टच बोलले…

apeksha sakpal | Updated on: Jun 26, 2023 | 3:34 PM

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करून संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी केली. यानंतर अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देणार का ? या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करून संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी केली. यानंतर अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देणार का ? या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा निर्णय कोणी एकटा घेत नाही. पक्षातील प्रमुख नेते निर्णय घेतील. सर्वांनीच पक्षाच्या कामात भाग घ्यावा अशी सर्वांची भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यापलिकडे त्यात काय नाही,” असं शरद पवार म्हणाले.

Published on: Jun 26, 2023 3:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us