साहेब, आपला आदेश…, ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं शीतल म्हात्रे नाराज?

साहेब, आपला आदेश…, ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं शीतल म्हात्रे नाराज?

| Updated on: Apr 30, 2026 | 4:19 PM

मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती ती अखेर खरी ठरली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र विधान परिषदेची दुसरी जागा कोणाला मिळेल याबाबत शिंदेंनी सांगितलं आहे.

विधान परिषदेवर जाण्यासाठी, नीलम गोऱ्हे यांच्यासह शितल म्हात्रे यांच्या नावाच्याही चर्चा रंगल्या होत्या, मध्यांतरी गोऱ्हेंना पक्षांतर्गत विरोध असल्याचं सांगितलं जात होतं, तेव्हा शितल म्हात्रेंना संधी मिळते की काय असं सगळ्यांना वाटत होतं. महत्त्वाची बाब म्हणजे, नीलम गोऱ्हेंच नाव जाहीर झाल्यानंतर शीतल म्हात्रेंनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यांनी लिहिलंय, ‘तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ… साहेब, आपला आदेश शिरसावंद्य…

आता या ट्वीटमुळे शितल म्हात्रे या नाराज आहेत का, असा प्रश्न पडला आहे. मात्र यावर त्यांची अद्याप काही प्रतिक्रिया नाही.

Published on: Apr 30, 2026 04:19 PM
Follow Us