India-Pakistan Conflict : पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी
Sindhu Water Treaty Dispute : सिंधु जल करार स्थगितीवरून पाकिस्तानच्या पंतप्रधानाने पुन्हा एकदा पोकळ धमकी दिलेली आहे.
पाकिस्तानचा पंतप्रधान शाहबाज शरीफ याने भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाकिस्तानचा पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार केला तर भारताला उत्तर देऊ, अशी फुसकी धमकी शाहबाज शरीफ याने दिलेली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याने भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात काही कठोर निर्णय घेण्यात आले होते. यात सिंधु जल करार स्थगितीचा देखील निर्णय आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला पाणी पुरवले जाणार नसल्याने पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाणी सोडण्यासंदर्भात आता पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान शाहबाज शरीफ हा पाकिस्तानी सैन्याला संबोधित करताना शाहबाज शरीफ हे बरळला आहे. पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार केला तर भारताला उत्तर देऊ, अशी फुसकी धमकी देत, पाकिस्तानचं सैन्य शौर्य, बलिदानाच्या बळावर पाणीहक्क मिळवून देतील, असंही म्हंटलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

