मंत्रालयासमोरील शिवसेनेचं ‘शिवालय’ही होणार शिंदे गटाचं? बघा काय केला दावा?

मंत्रालयासमोरील शिवसेनेचं ‘शिवालय’ही होणार शिंदे गटाचं? बघा काय केला दावा?

| Updated on: Feb 18, 2023 | 7:01 PM

VIDEO | मुंबई पालिकेतील पक्ष कार्यालयासह शिवालयावरही शिंदे गट हक्क सांगणार, बघा काय सुरू आहेत शिंदे गटाकडून हालचाली?

मुंबई : शिवसेना नेमकी कुणाची? याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागलेले असताना काल केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि त्याचं पक्ष चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं. यानंतर ठाकरे गटाची चिंता चागलीच वाढली असून ठाकरे गटात एकट खळबळ उडाली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. अशातच आता शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. विधानभवन, पालिकेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गट हक्क सांगणार आहे. शिंदे गटाकडून विधानभवन, मुंबई पालिकेतील पक्ष कार्यालयावर दावा करण्यात येत असताना आता मंत्रालयासमोर महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय शिवालय यावर देखील शिंदे गट दावा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

Published on: Feb 18, 2023 06:59 PM