Shirsdi | भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं… नाशिकच्या शिर्डीत कथित लव्ह जिहाद?
शिर्डी येथे एका हिंदू तरुणीशी संबंधित धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी हमीद पठाण या आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिर्डी येथे एका हिंदू तरुणीशी संबंधित धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी हमीद पठाण या आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती संगमनेर येथे मार्केटिंगचे काम करत असताना तिची हमीद पठाण याच्याशी ओळख झाली. ओळखीमुळे दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि नंतर ते लिव्ह-इनमध्ये राहू लागले. काही दिवसांनी या नात्याबद्दल घरच्यांना समजल्यावर वाद निर्माण झाले. त्यानंतर ती घर सोडून आरोपीसोबत लिव्ह इनमध्ये राहायला गेली, तिथेच तिला मुलगा झाला, असे तिने सांगितले.
पीडितेच्या तक्रारीनुसार चार महिने सगळं सुरळीत होतं. मात्र, पुढे तिच्यावर टिकली लावू नको, बुरखा घाल, बाहेर जाऊ नको, असं करत धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आला, तसेच गोमांससाठी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर काही संघटना आक्रमक झाल्या असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
