महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या

महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या

| Updated on: Aug 13, 2026 | 12:33 PM

शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात, आज कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार, आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री फडणविसांची भेट घेतली. वर्षा निवासानी दोन्हीही नेत्यांमध्ये 20 मिनिटं बैठक, राजकीय घडामोडींसह निधीवाटपा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक, अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची आठ खासदारांसोबत चर्चा. मतदार संघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा, […]

शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात, आज कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार, आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री फडणविसांची भेट घेतली. वर्षा निवासानी दोन्हीही नेत्यांमध्ये 20 मिनिटं बैठक, राजकीय घडामोडींसह निधीवाटपा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक, अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची आठ खासदारांसोबत चर्चा. मतदार संघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा, बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास, जलसंधारणाच्या बैठकीनंतर दोन्हीही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, नीट विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं दुपारी 3 वाजता निवेदन, तर राहुल गांधींकडून शहांच्या राजीनाम्याची मागणी. आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, आता शाह यांचा राजीनामा मागतायेत. विरोधकांना चर्चा करायची की राजीनाम्याची नाटकं करायची आहेत? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. मुख्यमंत्री, फडणवीसांचे निर्देश. राज्यात किमान 25 हजार सुरक्षित क्लासरूम उभारण्यात येणार. संसदेतील पेपर फुटी विरोधातील कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना. राजकीय आणि सामाजिक आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल होईल असे खटले मागे घेतले जाणार. FDA ची डोमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज नॉनव्हेज साठी एकच प्लॅटफॉर्म. मुंबईतील तीन आउटलेटचे परवाने निलंबित. अन्न सुरक्षेच्या गंभीर त्रुटींमुळे विलेपार्ले, बोरीवली आणि घाटकोपर मधील डोमिनोझच्या शाखांवर कारवाई. मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत. जगतारा दरीतील वळणावर एका अज्ञात ट्रकशी रिद्धीच्या बाईकला जोरदार धडक. अपघातानंतर ट्रक चालक फरार.

Published on: Aug 13, 2026 12:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us