Ambadas Danve | मध्यरात्री फोन आला, मी कट केला, पुन्हा फोन आला, पुन्हा कट केला, पुन्हा फोन… अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे या गंभीर परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून रात्री 12 ते 2 च्या दरम्यान सतत धमकीचे फोन येत आहेत. सुरवातीला त्यांनी याकडे फार लक्ष दिले नाही, परंतु फोन सतत येत राहिल्यामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे या गंभीर परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून रात्री 12 ते 2 च्या दरम्यान सतत धमकीचे फोन येत आहेत. सुरवातीला त्यांनी याकडे फार लक्ष दिले नाही, परंतु फोन सतत येत राहिल्यामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली. दानवे यांनी सांगितले की, “धमक्यांमुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, परंतु मी या धमक्यांमुळे घाबरत नाही.” त्यांनी पोलिसांकडे खबरदारीचा उपाय करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना त्यांचा बळी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकारणात धमक्या सुरू असतात. धमकी देणारा कधी रागाच्या भरात धमकी देतो तर कधी दारू पिऊन देतो. त्याला कळत नसतं. पण मला दिनांक 12, 13, 14, 15 या तारखेला सतत धमक्यांचे फोन आले. मी फार सीरियस घेतलं नाही. मात्र मध्यरात्री झोपेत असताना फोन आला मी कट केला. पुन्हा आला मी कट केला. पुन्हा आला. त्यानंतर मी फक्त फोन ऐकत होतो. परत दोन-तीनदा मिस कॉल आले परत मी झोपी गेलो, अशी माहितीही त्यांनी दिली.
