मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर…

मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर…

| Updated on: Aug 04, 2026 | 5:44 PM

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह प्रकरणासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून आता याप्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या कामकाजादरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यात या प्रकरणावर चर्चा झाली. मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण उद्याच्या सुनावणीसाठी घेण्याबाबत विचारणा केली. त्यावर कपिल सिब्बल यांनी याला होकार देत प्रकरण उद्या प्राधान्याने घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी आधी मिसलेनियस प्रकरणे घ्यावी लागतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर सिब्बल यांनी उद्या थोडा वेळ देण्याची मागणी केली आणि दुपारी २ वाजता प्रकरण घेण्याची विनंती केली. दुपारी २ वाजता वेळ दिल्यास सुनावणी होईल, अन्यथा नेहमीप्रमाणे पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल, अशी बाजू सिब्बल यांनी मांडली. Live Law ने दिलेल्या वृत्तानुसार, आता याप्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष असेल.

सुनावणी पुढे ढकलल्याने आज या प्रकरणावर कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. आता बुधवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालयीन प्रक्रियेला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे, अशी अपेक्षा आहे.

Published on: Aug 04, 2026 5:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us