Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा… आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी पक्षप्रमुख पद, पक्षाची घटना आणि अंतर्गत लोकशाहीवर युक्तिवाद केला. बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पद गोठवल्याचा आणि ठाकरेंनी नवी घटना सादर न केल्याचा दावा त्यांनी केला. मूळ पक्ष कोणता, हाच खरा मुद्दा असल्याचे कौल यांनी अधोरेखित केले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी न्यायालयात आपला युक्तिवाद मांडला. कौल यांच्या युक्तिवादाचा हा दुसरा दिवस होता. कौल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर २०१३ मध्ये शिवसेना प्रमुख पद गोठवण्यात आले होते.
तसेच, ठाकरे गटाने पक्षाची नवीन घटना निवडणूक आयोगाकडे सादर केली नाही. पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, असेही कौल यांनी नमूद केले. कोणता मूळ पक्ष आहे, हाच सध्या कळीचा मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले. शिंदे यांनी आमदार आणि मंत्री म्हणून केलेले काम हे लोकप्रतिनिधी म्हणून केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
