शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?

शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 05, 2026 | 5:21 PM

शिवसेना पक्षाच्या मूळ पक्षावरील दाव्याच्या प्रकरणात आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. जोरदार युक्तावादानंतर आजची सुनावणी संपली आहे.  दोन्ही पक्षांनी मूळ पक्षावर दावा केला

शिवसेना पक्षाच्या मूळ पक्षावरील दाव्याच्या प्रकरणात आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. जोरदार युक्तावादानंतर आजची सुनावणी संपली आहे.  दोन्ही पक्षांनी मूळ पक्षावर दावा केला होता. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर निकाल केवळ विधीमंडळ पक्षाच्या संख्येच्या आधारावर कसा देण्यात आला, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.

विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग आहे, मात्र तो मूळ राजकीय पक्ष नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेलेल्या आमदारांनी ठराव करून एकनाथ शिंदे हे मुख्य नेते असल्याचे ठरवले. तसेच गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि काही नेते व उपनेते यांचीही नियुक्ती करण्यात आली.

यावर सिब्बल यांनी मुख्य नेता हे पद पक्षाच्या घटनेत नसल्याचा मुद्दा मांडला. तसेच पक्षाची घटना योग्य आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणातील पुढील सुनावणी उद्या होणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार असून, त्यावेळी या प्रकरणात काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 05, 2026 5:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us