Sanjay Raut : ‘खबर पता चली क्या?’, संजय राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं, नेमके संकेत काय?
'राज्याच्या राजकारणात काही तरी होत आहे. ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगणार आहे', असं म्हणत संजय राऊत यांनी सूचक असं वक्तव्य या ट्वीटनंतर केले आहे.
शहाणपणा केला तर मान उडवेन, असं दिल्लीत महाराष्ट्राच्या बकऱ्याला सांगितलं, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. इतकंच नाहीतर दोन ते तीन दिवस थांबा माझ्या ट्वीटचा अर्थ कळेल, असं सूचक भाष्य देखील संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी नुकतंच एक ट्वीट केल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये एका खाटकाच्या लाकडावर एक बकरा उभा असल्याचे दिसतेय. असा फोटो संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून शेअर केला आहे. या फोटोसह संजय राऊत यांनी खबर पता चली क्या? असा सवाल कर एसंशिं गट… असं कॅप्शन देखील संजय राऊत यांनी दिलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचं दिसतंय.
दरम्यान, पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना त्यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात सवाल केला असता ते म्हणाले, महाराष्ट्रातील एक बकरा खटकाजवळ उभा आहे. त्याला खटकाच्या लाकडावर उभे करण्यात आले आहे. त्याला कापण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याला सांगितले फार शहाणपण करु नको. गप्प बस. फक्त बे बे करत राहा, असे दिल्लीतून कोणीतरी त्या बकऱ्याला सांगितले आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले.
