लोकशाही न मानणाऱ्यांच्या या निकालाने कानफटात, शिंदेंच्या आमदाराची थेट प्रतिक्रिया

लोकशाही न मानणाऱ्यांच्या या निकालाने कानफटात, शिंदेंच्या आमदाराची थेट प्रतिक्रिया

Harshada Shinkar | Updated on: Jan 11, 2024 | 2:11 PM

राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकाल काल जाहीर करत एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे म्हटलं आहे. या निकालाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. या निकालावर साताऱ्यातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सातारा, ११ जानेवारी २०२४ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकाल काल जाहीर करत एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे म्हटलं आहे. या निकालाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. या निकालावर साताऱ्यातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी आधीही भाकीत केलं होतं हा निकाल आमच्याच बाजूने लागणार… ज्यांनी हुकूमशाही चालवली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीला मानत नव्हते त्यांच्या या निकालाने कानफटात लगावलेली आहे. 2013 आणि 2018 ला निवडणुका ह्या फक्त पेपरवर दाखवल्या. त्यावेळच्या पक्षपत्रोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी केली असता त्यांनी मत दिलं का विचारला असता ते सांगू शकले नाहीत. याचाच अर्थ स्वतःच्य पक्षामध्ये लोकशाही जिवंत न ठेवणारे तेच उलट आम्हाला प्रश्न विचारतात की लोकशाही राहिली नाही’, असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: Jan 11, 2024 2:11 PM
Follow Us