मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
आसाममधील जोरहाट विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या IAF च्या AN-32 मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमान जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर विमानाला आग लागल्याची माहिती मिळत आहे.
आसाममधील जोरहाट विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या IAF च्या AN-32 मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमान जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर विमानाला आग लागल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेनंतर विमानतळ परिसरात मोठी धावपळ उडाली.
घटनेनंतर तात्काळ बचाव आणि अग्निशमन पथके घटनास्थळी दाखल झाली. विमानातील जवान आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र काही जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
AN-32 हे भारतीय वायुसेनेचे महत्त्वाचे मालवाहू विमान मानले जाते. दुर्गम भागात सैन्य साहित्य आणि जवानांची वाहतूक करण्यासाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून IAF कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
