Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा

Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा

| Updated on: Nov 27, 2026 | 12:06 PM

सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. पॅनलने 19 पैकी 18 जागा जिंकून बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख विजयी झाल्याने प्रतिष्ठा वाढली असून, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. एकूण 19 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवत या पॅनलने बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

या निवडणुकीत 10 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 9 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. या 9 जागांपैकी भाजपने 8 जागा जिंकल्या आहेत. आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांनी मोहिते पाटील पॅनलचे अमोल शिंदे यांचा 20 मतांनी पराभव करत विजय मिळवला. मोहिते पाटील कुटुंबातील अर्जुनसिंह मोहिते पाटील हे एकमेव उमेदवार विजयी झाले. या निकालाने जिल्ह्यातील राजकारणात भाजपचे स्थान अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.

 

Published on: Nov 27, 2026 12:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us