Special Report | शिवसेनेचे आनंदराव अडसूळ खरंच ईडीच्या ताब्यात ?

| Updated on: Sep 27, 2021 | 9:19 PM

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली. त्यानंतर त्यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार टोला लगावलाय. ईडीने अडसूळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत. अटक होताच आजारी पडले, असा टोला लगावतानाच त्यांनी अडसूळ आणि हसन मुश्रीफांनाही जोरदार टोला लगावला आहे.

Follow us on

सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्याबाबत अडसूळ आणि उद्धव ठाकरे कुणीच उत्तर देत नाही. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यवधी रुपये खासगी खात्यात वळवले. बाप-बेटे मजा मारत आहेत. कर्नाळा बँक प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ईडीला कारवाई करावी लागली. त्याचं मी स्वागत करतो, अशा शब्दात अडसूळांवरील कारवाईचं सोमय्या यांनी स्वागत केलं आहे.

दरम्यान, आज सकाळी आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं.