प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान

प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान

| Updated on: Aug 23, 2026 | 8:26 PM

सांगली | प्रतिनिधी: सांगलीतील कुपवाड मोर्चात भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेत थेट आव्हान दिलं आहे. “पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा,” असं सुळे म्हणाल्या. कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात लांडगे यांनी केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे. […]

सांगली | प्रतिनिधी: सांगलीतील कुपवाड मोर्चात भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेत थेट आव्हान दिलं आहे. “पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा,” असं सुळे म्हणाल्या.

कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात लांडगे यांनी केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

सुळे म्हणाल्या की, अशा वक्तव्यांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल आणि सर्वसामान्य नागरिक भरडला जाईल. “हा छत्रपती, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे,” असं सांगत त्यांनी प्रक्षोभक भाषणांवर कठोर कारवाईची मागणी केली.

Published on: Aug 23, 2026 8:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us