Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या…
सुप्रिया सुळे यांनी विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, हात उचलणे चुकीचे असल्याचे म्हटले. डीजे नियमांची अंमलबजावणी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर त्यांनी चिंता व्यक्त केली. शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्याचा आग्रह धरत, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आमदारांना आवरावे असे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “कुणावर हात उगारणे हे चुकीचे असून, आम्ही ते खपवून घेणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्यावर भर दिला. मारामारी करणे ही आपली संस्कृती नसल्याचेही त्यांनी नमूद केले. यासोबतच, सुळे यांनी डीजे नियमांच्या अंमलबजावणीवर आवाज उचलला. गणेश विसर्जनावेळी डीजेच्या आवाजासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन होणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
नागपूरमध्ये जर डीजेवर बंदी किंवा नियम लागू होत असतील, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुलांच्या अभ्यासावर, रुग्णालयांतील रुग्णांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी लक्ष वेधले. सण साजरे करावेत, पण ते नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून, कुणाच्या मनमर्जीने नव्हे, असे आवाहन सुळे यांनी केले.
