NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?

NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?

| Updated on: Aug 04, 2026 | 6:39 PM

बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुरू झालेल्या वादाला आता राजकीय रंग आला आहे. सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून काँग्रेस कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात दाखल झाले. यावेळी सूरज चव्हाण यांनी, “ कॉंग्रेस नेत्यांनी त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. पुढे त्यांनी सांगितले की “हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलगिरी व्यक्त करावे. महिलेचा अपमान करणे ही काँग्रेचा दुटप्पी भुमिका करू शकातात. ही काँग्रेसची संस्कृती योग्य आहे का,” असा सवाल केला.

“महिलेला कमी लेखण्याच काम काँग्रेस करत आहे. आज आणि त्यांना त्यांची भुमिका विचारण्यासाठी आलो. नाहीतर आम्ही कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही,” असेही त्यांनी म्हटले. तसेच “ते चर्चा करताता की पळून जाताय. सपकाळ यांनी पूर्ण पत्रकार परिषद पहावे,” असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने जाहिर ट्विट करत, “सुरज चव्हाण यांना कॉंग्रेस कार्यालयावर आंदोलक करायला कोणी सांगितलं? त्यांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे. ते कोणच्या आदेशावरून गांधी भवनात राडा करायला आले?” असा खोचक सवाल केला आहे.

Published on: Aug 04, 2026 6:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us