थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं…
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी दुर्घटना टळली असून, रस्त्यालगत लावलेला एक मोठा बॅनर अचानक कोसळून दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत दुचाकीवरील प्रवासी थोडक्यात बचावले असून, कोणतीही गंभीर जीवितहानी झालेली नाही.

घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, बॅनर कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अचानक बॅनर कोसळल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित बॅनरबाबत प्रतिक्रिया देताना सुनील चौधरी यांनी हा बॅनर आपल्या कार्यकर्त्याने लावल्याचे मान्य केले. “माझ्या कार्यकर्त्याने लावलेला हा बॅनर कोसळला. या घटनेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो,” असे त्यांनी म्हटले.
या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित यंत्रणांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.