Thane | भलंमोठं लोखंडी होर्डींग कोसळलं अन्… धो-धो पावसादरम्यान मोठी दुर्घटना

Thane | भलंमोठं लोखंडी होर्डींग कोसळलं अन्… धो-धो पावसादरम्यान मोठी दुर्घटना

| Updated on: Jul 06, 2026 | 10:30 AM

ठाण्यातील पोखरण परिसरातील सुभाषनगर बस स्टॉपसमोर आज मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यालगत उभारण्यात आलेले भलंमोठं लोखंडी होर्डिंग अचानक कोसळले. ही घटना सकाळचया सुमारास घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ठाण्यातील पोखरण परिसरातील सुभाषनगर बस स्टॉपसमोर आज मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यालगत उभारण्यात आलेले भलंमोठं लोखंडी होर्डिंग अचानक कोसळले. ही घटना सकाळच्या सुमारास घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र होर्डिंग कोसळल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जोरदार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे परिसरात वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक वाहनचालकांना काही वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

दरम्यान, घटना घडून काही काळ उलटा तरी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाणे आणि मुंबई परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Jul 06, 2026 10:29 AM
Follow Us