प्रवाशी असलेल्या बसवर दगडफेक, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल, बसचे नुकसान

| Updated on: Jan 14, 2022 | 11:07 PM

अकोला जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला आगाराची बस MH40 - 5808 वर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. अकोला आगाराची ही बस बाळापूरमार्गे शेगावला निघाली होती.

Follow us on

अकोला : अकोला जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला आगाराची बस MH40 – 5808 वर  अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली (Throwing stones at bus). या घटनेमध्ये प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. अकोला (akola) आगाराची ही बस बाळापूरमार्गे शेगावला (shegon) निघाली होती. ही बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शेदळ फाट्याजवळ आली असताना अचानक मागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये ड्रायव्हर साईटची बसची काच फुटली आहे. दरम्यान अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे चालक, वाहक गोंधळून गेले. तसेच प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते. त्यानंतर ही बस बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आणून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत.