कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच…

कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच…

| Updated on: Jun 23, 2026 | 5:20 PM

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोड परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली.

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोड परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली. ही फांदी थेट रस्त्यावर पडल्यामुळे परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अचानक घडलेल्या प्रकारामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी त्वरित फांदी हटवण्याचे काम सुरू केले. तसेच वाहतूक पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळ वाहने संथ गतीने सुरू होती. संतोषी माता रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Published on: Jun 23, 2026 5:20 PM
Follow Us