मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात… उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये नागपूरहून गडचिरोलीला जात असताना तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. सूरजागड प्रकल्पाच्या पाहणीसाठी सामंत नागपूरहून गडचिरोलीकडे रवाना होणार होते. मात्र हेलिकॉप्टर सुरू करून टेकऑफ घेण्याच्या तयारीत असतानाच पायलटच्या निदर्शनास तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे तातडीने उड्डाण रद्द करण्यात आले.

पायलटने वेळीच तांत्रिक समस्या ओळखल्याने हेलिकॉप्टरने प्रत्यक्ष उड्डाण केले नाही आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नसून उदय सामंत सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द केल्यानंतर आता सामंत रस्त्याने गडचिरोलीकडे रवाना झाले आहेत.
उदय सामंत यांनी स्वतः या घटनेला दुजोरा दिला आहे. “ही बातमी खरी आहे. सकाळी पावणे नऊ वाजता मी नागपूरहून सूरजागड प्रकल्पाच्या पाहणीसाठी निघालो होतो. हेलिकॉप्टर सुरू केल्यानंतर टेकऑफ घेताना त्यात बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. पायलटने वेळीच लक्ष दिल्यामुळे आम्ही टेकऑफच घेतला नाही. आता आम्ही बाय रोड गडचिरोलीला निघालो आहोत,” अशी माहिती सामंत यांनी दिली.
दरम्यान, हेलिकॉप्टरच्या उड्डाणापूर्वी करण्यात येणाऱ्या तांत्रिक तपासणीदरम्यान हा बिघाड का लक्षात आला नाही, असा सवाल स्थानिक शिवसैनिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सूरजागड येथील प्रकल्पाच्या पाहणीसाठी उदय सामंत गडचिरोलीला जाणार होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा हवाई प्रवास रद्द झाला. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याने या घटनेची आता चर्चा सुरू झाली आहे.