Uddhav Thackeray : पहलगामचे अतिरेकी भाजपात… लाज वाटली पाहिजे… ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
भाजप मेलेला आहे. त्याचाच खून या लोकांनी केलाय. त्यांचं जे काही रुदाली चालू आहे, रुदाली हा हिंदी शब्द आहे. त्यांनी जे काही उर बडवायला घेतलेत. आमच्या पक्षातले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ले उरबडवे घेतलेत. मूळ भाजप ज्यांची शिवसेनेसोबत युती होती, त्या भाजपला या लोकांनी मारुन टाकलंय, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी़ डोम येथे ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. यावर भाजपने जोरदार हल्लाबोल केला. विजयी मेळाव्यातील ठाकरेंच्या भाषणांना रडगाणं, रुदाली असं म्हणत भाजपने टीकास्त्र डागलं होतं. यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मराठीचे महाराष्ट्राचे मारेकरी हेच आहेत. या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. इतकंच नाहीतर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का? मिळत कसे नाहीत?’, असा सवाल करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ज्यांनी आमच्यावर आरोप केले, त्यांच्या घरात पहलगामचे अतिरेकी राहतायत का? लाज वाटली पाहिजे. हिंदूंना वाचवू शकत नाहीत आणि मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेताय, हे कर्म दरिद्री लोक महाराष्ट्रात दुर्देवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

