जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये… उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज संजय जाधव यांच्या मतदारसंघात आहेत. त्यांच्या परभणी दौऱ्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले
उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज संजय जाधव यांच्या मतदारसंघात आहेत. त्यांच्या परभणी दौऱ्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी बंडखोर खासदारंवर जोरदार हल्लाबोल केला. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबन खासदार संजय राऊत, अरविंद सावंत तसेच इतर नेतेही उपस्थि होते.
या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मला विशेष म्हणजे येथिल जनतेची माफी मागायची आहे. त्यांच्यासोबत जो विश्वासघात झाला त्याची मी माफी मगाणार असं त्यांनी सांगितलं. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी विमानातील प्रवासाबाबत विचारला असता ते आधी हसले. अखेर त्यांनी सुचक उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, जे बोलणं झालं जे ठऱलं ते दोन दिवसात कळेल…’ त्यांच्या या विधाननंतर एकच खळबळ उडाली आहे.
Published on: Jun 28, 2026 1:06 PM
Follow Us
