उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्…
अयोध्या मंदिरातील कथित देणगी दान चोरी प्रकरणावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. दादर येथील हनुमान मंदिरात हे आंदोलन पार पडणार असून रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालीसा म्हणत निषेध व्यक्त केला जाणार आहे,
अयोध्या मंदिरातील कथित देणगी दान चोरी प्रकरणावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. दादर येथील हनुमान मंदिरात हे आंदोलन पार पडणार असून रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालीसा म्हणत निषेध व्यक्त केला जाणार आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या आंदोलनात अयोध्येतील काही महंत आणि पंडित देखील सहभागी होणार आहेत. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे हेदेखील आंदोलनात उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी धार्मिक वातावरण निर्माण झाले असून अनेक भाविक आणि समर्थक दाखल होत आहेत. यावेळी शंख नाद करत आंदोलनाची भव्य सुरुवात करण्यात आली आहे.
अयोध्या मंदिरातील कथित देणगी दान चोरी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
