Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ

Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ

| Updated on: Jul 05, 2026 | 5:17 PM

अयोध्येतील कथित देणगी दान चोरी प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक झाला असून आज दादरमध्ये रामरक्षा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दादर येथील हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि भाविकांनी गर्दी केली आहे. या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित झाले असून त्यांच्या हस्ते रामरक्षा पठणाला सुरुवात करण्यात आली.

अयोध्येतील कथित देणगी दान चोरी प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक झाला असून आज दादरमध्ये रामरक्षा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दादर येथील हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि भाविकांनी गर्दी केली आहे. या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित झाले असून त्यांच्या हस्ते रामरक्षा पठणाला सुरुवात करण्यात आली. धार्मिक वातावरणात शंखनाद करत आंदोलनाची भव्य सुरुवात करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, किशोरी पेडणेकर तसेच ठाकरे गटातील इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. आंदोलनादरम्यान रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करण्यात येत असून अयोध्या प्रकरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात येत आहे.

या आंदोलनात अयोध्येतील काही महंत आणि पंडित देखील सहभागी झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थिती लावली आहे. अयोध्या मंदिरातील कथित देणगी दान चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Published on: Jul 05, 2026 5:13 PM
Follow Us