Operation Sindoor : हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
Udhav Thackeray On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचं देशात सगळ्यांकडून स्वागत केलं जात आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
दहशतवादी तळांवर केलेला हल्ला हा अभिमानास्पद आहे, असं उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून आज पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेलेले आहेत. त्यावर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धव ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूरचं देखील कौतुक केलेलं आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतल्याचंही ते म्हणाले. तसंच आता भारतातील पाकिस्तानचे स्लिपरसेल उद्ध्वस्त करणं गरजेचं होतं, असंही ठाकरे यांनी म्हंटलं.
Published on: May 07, 2025 04:38 PM
Latest Videos
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

