मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
तामिळनाडूत अभिनेत्री त्रिषा कृष्णन यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या तंजावूरमधील भाषणातील एका वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाला. या प्रकरणी आता कोर्टाने मोठा आदेश दिला आहे.

कावेरी नदी पाणीप्रश्नावर भाषण सुरू असताना उपस्थितांपैकी एका व्यक्तीने मोठ्याने अभिनेत्री त्रिषा यांचं नाव घेतलं. यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी स्मितहास्य करत कथित द्विअर्थी विधान केल्याचा आरोप विजय समर्थकांकडून करण्यात आला. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून, त्यांच्या वक्तव्यावरून टीकाही करण्यात येत आहे.
या प्रकरणानंतर पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात कोर्टाने तातडीचे निर्देश दिले आहेत. चौकशी करून उदयनिधी स्टॅलिन यांची सुटका करावी, असे आदेश कोर्टाने दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.