Israel Vs Iran War New | अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका

Israel Vs Iran War New | अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका

| Updated on: Mar 05, 2026 | 1:50 PM

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता जगभरात उमटताना दिसत आहेत. या युद्धाचा परिणाम महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चटई उद्योगावरही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चटई उत्पादन केले जाते. येथील चटई आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता जगभरात उमटताना दिसत आहेत. या युद्धाचा परिणाम महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चटई उद्योगावरही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चटई उत्पादन केले जाते. येथील चटई आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मात्र सध्या सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे या निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून चटईची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. निर्यात थांबल्यामुळे स्थानिक चटई उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसत असून अनेक उद्योजक अडचणीत सापडले आहेत. परिणामी जळगाव जिल्ह्यातील चटई उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. युद्धस्थिती लवकरात लवकर निवळावी आणि निर्यात पुन्हा सुरळीत सुरू व्हावी, अशी अपेक्षा चटई उद्योगाशी संबंधित उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 05, 2026 01:50 PM
Follow Us