Rupali Chakankar : म्हणून मयूरी हगवणेच्या तक्रारीवर कारवाई झाली नाही; रूपाली चाकणकरांनी सांगितलं कारण
Vaishnavi Hagawane case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर आज महिल्या आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रूपाली चाकणकर यांनी यावर भाष्य केलं.
मयूरी हगवणेच्या प्रकरणात दोन्हीकडून तक्रारी आल्या होत्या, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हंटलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आज महिला आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी रूपाली चाकणकर यांनी मयूरी हगवणेच्या तक्रारीवर देखील भाष्य केल.
पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, 6/11/2024 रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला होता. हा मेल होता रात्री पाठवलेला. हा मेल आल्यावर पोलिसांना पाठवून त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांचे भाऊ, भावजय आणि घरातील लोकांच्या विरोधात तक्रार होती. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2024 रोजीच मयुरी हगवणेचा भाऊ मेघराज जगतापने आमच्याकडे तक्रार केली होती. ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्यानुषंगाने 7 तारखेला 11.30 वाजता या दोन्ही तक्रारी बावधन पोलिसांना पाठवून कारवाई करण्यास सांगितलं. तक्रारदार आणि पोलिसांनाही पत्र पाठवलं होतं. 6 नोव्हेंबर रोजी 485 ची एफआयआर दाखल झाली होती. एक करिश्मा हगवणेची आणि दुसरी मेघराज जगताप यांचीही एफआयआर घेण्यात आल्या. बावधन पोलिसांनी या दोन्ही वेगवेगळ्या तक्रारी घेतल्या होत्या. मात्र क्रॉस कम्प्लेंट होत्या. तक्रारदार हे कुटुंबातीलच असल्याने कौटुंबिकवाद कौन्सिलिंग करून मिटवले जाते. त्यानुसा कुटुंबातील लोकांना कौन्सिलिंगसाठी बोलावलं होत, असं स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिलं आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

