गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस… विनायक राऊतांच्या सूनेचा हादरवणारा दावा; थेट….
सध्या शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत खासगी आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. गितेश राऊत यांच्या पत्नीने पोलिसात राऊत कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. गिरिजा राऊत यांनी तक्रारीमध्ये पती गितेश राऊत यांच्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात नवरा गितेश राऊत आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी हनीमूनसाठी ऊटी येथे गेले असताना शारिरीक संबंध न ठेवता अनेक कारणे दिल्याचे देखील सांगितले. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत, मी खूप नाजूक मुलगा आहे, तू मला हात लावतेस असे बहाणे देत असल्याचे गिरिजा यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
राऊत कुटुंबानं गोमूत्र प्यायला लावलं अन् डोक्यावरील केस कापायला लावत्याचा आरोपही राऊतांच्या सून गिराजा यांनी केला आहे. इतकेच नाही तर जादूटोणा बाबाबूवाचे प्रकार केल्याचा आरोपही केला आहे. गिरिजा यांच्या आरोपांनंतर फिरोज नावाच्या भोंदूबाबला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.