विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर विशेष पथक स्थापन, आता…

विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर विशेष पथक स्थापन, आता…

| Updated on: Jul 12, 2026 | 4:59 PM

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत आणि सासरे विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील इतरांविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी एकूण 7 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात दोन भोंदू बाबांची नावे समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. तक्रारीतील आरोपांमध्ये या दोघांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, भोंदूबाबा फिरोज शेख याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. तर दुसरा भोंदूबाबा काझी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 2 विशेष पथके तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jul 12, 2026 4:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us