Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

| Updated on: Jul 12, 2026 | 12:22 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्या सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गिरीजा राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आता विनायक राऊत यांनी प्रथमच माध्यमांसमोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

माध्यमांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “आमच्या कुटुंबावरील सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे आहेत. गितेश आणि गिरीजा यांचे लग्न झाल्यानंतर गेली तीन वर्षे त्या आमच्यासोबत राहत नाहीत. २०१८ ते २०२२ या कालावधीत कथित अघोरी प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, त्या काळात गिरीजा आपल्या आई-वडिलांसोबत ये-जा करत होत्या. जर असे प्रकार खरोखर घडले असतील, तर त्याचवेळी तक्रार का करण्यात आली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विनायक राऊत यांनी पुढे दावा केला की, गिरीजा राऊत यांनी अलीकडेच घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये तडजोडीच्या बैठका झाल्या होत्या. “तडजोडीच्या बदल्यात तीन बीएचके फ्लॅट, टेरेस फ्लॅट, पाच कोटी रुपये आणि इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा घटस्फोटाची नोटीस देण्यात आली असून, त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करण्यात आले आहेत,” असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत विनायक राऊत यांना या सर्व घटनांची माहिती असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनायक राऊत, गितेश राऊत आणि इतरांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोन तथाकथित बाबांचाही या प्रकरणात समावेश आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, दोन्ही बाजूंनी गंभीर दावे-प्रतिदावे करण्यात येत असल्याने तपासातून पुढे कोणती तथ्ये समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

Published on: Jul 12, 2026 12:22 PM
Follow Us