180 फूट उंचीवर रीलबाजी! पुणे-मुंबई मिसिंग लिंक प्रकल्पात सुरक्षेचा बोजवारा? व्हिडीओ व्हायरल

180 फूट उंचीवर रीलबाजी! पुणे-मुंबई मिसिंग लिंक प्रकल्पात सुरक्षेचा बोजवारा? व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 07, 2026 | 11:37 AM

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सुमारे 180 फूट उंच पुलावर काम सुरू असताना एका कामगाराने क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बसून रील बनवल्याचे दिसून आले आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सुमारे 180 फूट उंच पुलावर काम सुरू असताना एका कामगाराने क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बसून रील बनवल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, त्या ट्रॉलीमध्ये आणखी चार ते पाच कामगार उपस्थित होते.

या प्रकारामुळे सुरक्षेच्या नियमांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढ्या उंचीवर सुरू असलेल्या कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर एमएसआरडीसीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “प्रवाशांच्या आणि कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Published on: May 07, 2026 11:37 AM
Follow Us