West Bengal Elections Result | पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएम मोजणीला सुरुवात; पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत

West Bengal Elections Result | पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएम मोजणीला सुरुवात; पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत

| Updated on: May 04, 2026 | 9:26 AM

पश्चिम बंगालमध्ये 293 जागांसाठी मतदान झाले असून, येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपयांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार पहिल्या अर्ध्या तासात भाजपने 72 जागांवर आघाडी घेतली असून, तृणमूल काँग्रेस 69 जागांवर आघाडीवर आहे.

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची (पोस्टल बॅलेट) मोजणी सुरू असून, साधारण 30 ते 40 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात होईल आणि निकालांचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागेल. पश्चिम बंगालमध्ये 293 जागांसाठी मतदान झाले असून, येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपयांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार पहिल्या अर्ध्या तासात भाजपने 72 जागांवर आघाडी घेतली असून, तृणमूल काँग्रेस 69 जागांवर आघाडीवर आहे. भवानीपूर या हाय-प्रोफाइल मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट सामना रंगला आहे. या लढतीकडे देशाचे विशेष लक्ष लागले असून, पुढील काही तासांत अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे.

 

Published on: May 04, 2026 9:26 AM
Follow Us