Raghunath Kuchikने लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार केले, पीडित तरुणीचा आरोप
पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी समोर येत आहे. रघुनाथ कुचिक यांनी लैंगिक अत्याचार (Abuse) केला असा आरोप करणारी पीडित तरुणी समोर आली आहे.
पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी समोर येत आहे. रघुनाथ कुचिक यांनी लैंगिक अत्याचार (Abuse) केला असा आरोप करणारी पीडित तरुणी समोर आली आहे. कुचिक यांनी आपल्याला लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार केला, असा आरोप या पीडित तरुणीने टीव्ही 9सोबत बोलताना केला आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याशीही संपर्क साधला, मात्र त्यांनी मदत केली नाही, असा आरोप या महिलेने केला आहे. इंजेक्शन देऊन बेशुद्धावस्थेत कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेण्यात आल्यात, असे या महिलेचे म्हणणे आहे. महिला आयोग, पुणे पोलिसांकडून आपल्याला मदत मिळाली नाही, म्हणून चित्रा वाघ यांच्याकडे जावे लागले, असे या महिलेने सांगितले आहे.
Published on: Mar 20, 2022 4:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
