"दादा जर तुम्ही आम्हाला 6 वाजता दिसला नाहीत, तर मी तुम्हाला दिसणार नाही"

"आदरणीय दादा जर तुम्ही आम्हाला 6 वाजता दिसला नाहीत, तर मी तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाही," अशा आशयाची फेसबुक पोस्ट राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने (Babu giri Facebook Post on Ajit Pawar) लिहिली आहे.

"दादा जर तुम्ही आम्हाला 6 वाजता दिसला नाहीत, तर मी तुम्हाला दिसणार नाही"

अहमदनगर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके कुठे आहेत याची शोधाशोध सुरु होती. नगरमधील साखर कारखाना, कर्जतमधील फार्म हाऊसवरही अनेक कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र यानंतरही अजित पवार न सापडल्याने राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने आक्रमक (Babu giri Facebook Post on Ajit Pawar) पावित्रा घेतला आहे. “आदरणीय दादा जर तुम्ही आम्हाला 6 वाजता दिसला नाहीत, तर मी तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाही,” अशा आशयाची फेसबुक पोस्ट राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने (Babu giri Facebook Post on Ajit Pawar) लिहिली आहे.

शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास बाबू अवरी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याबाबतची पोस्ट लिहिली. बाबू अवरी हा राष्ट्रवादीचा नगरमधील कार्यकर्ता आहे. बाबूने त्या फेसबुकवर अजित पवारांसोबतचा फोटो टाकत एक पोस्ट (Babu giri Facebook Post on Ajit Pawar) लिहिली आहे. यात त्याने आदरणीय दादा तुम्ही जर आम्हाला 6.00 वाजता दिसले नाही तर मी तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाही, असे लिहिले आहे. तसेच आदरणीय दादा तुमच्यासाठी काही पण असेही बाबूने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“तुझ्या अगोदरही कोणी नव्हते आणि तुझ्यानंतरही कोणी नसेल, जोपर्यंत श्वासात श्वास आहे. तोपर्यंत माझी श्रद्धा आणि भक्ती तुझ्यावरच असेल”, अशीही पोस्ट बाबूने फेसबुकवर लिहिली होती. ‘अजित पवारांचा कट्टर समर्थक’ असेही त्याने यात म्हटलं आहे.

त्याच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याला असे काहीही करु नकोस, रडायचं नाही लढायंच, उगाच चुकीचे पाऊल उचलू नका अशा कमेंट (Babu giri Facebook Post on Ajit Pawar) अनेकांनी केल्या आहे.


दरम्यान आज दुपारी 1 च्या सुमारास अजित पवार (Ajit Pawar resigns) शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी खुद्द शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईतील घरी सिल्व्हर ओकला पोहोचले. अजित पवारांपाठोपाठ त्यांचे सख्खे लहान भाऊन श्रीनिवास पवारही सिल्व्हर ओकला आले. पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांनी  कौटुंबीक बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नेते शरद पवारांच्या घरातील बाहेरच्या खोलीत होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *