AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेलार ओरडले ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’, भाजप आमदार म्हणाले…

सोनियाचा पोपट काय म्हणतो, अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर '25 हजाराला नाही म्हणतो' अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं

शेलार ओरडले 'सोनियाचा पोपट काय म्हणतो', भाजप आमदार म्हणाले...
| Updated on: Dec 18, 2019 | 11:31 AM
Share

नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा म्हणजेच तिसरा दिवस शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या भाजप आमदारांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’ असा नारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला, त्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ असं म्हणत भाजप आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका (BJP Slogans against Uddhav Thackeray) केली.

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत भाजप आमदारांनी विधीमंडळाचं कामकाज रोखून धरण्याचा पवित्रा घेतला आहे. हेक्टरी 25 हजारांची मदत झालीच पाहिजे, दिलेला शब्द पूर्ण करा, अशा मागण्या भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केल्या. ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी घोषणाबाजी केली.

शिवसेना आणि भाजप आमदारांची सभागृहात हाणामारी, मध्यस्थीसाठी दिग्गज धावले

भाजप नेते आशिष शेलार यांची विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रवीण दरेकर हे विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते म्हणून भूमिका बजावतील. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दुसऱ्या दिवशी भाजपने ‘सामना’तील बातमी दाखवत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे आमदार इतके संतापले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली. सोमवारी (पहिला दिवस) सावकरांच्या मुद्द्यावर विरोधकांनी गाजवला होता.

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या मारामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही हाणामारी सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्थी केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले.

BJP Slogans against Uddhav Thackeray

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.