सेनेची महत्त्वाची बैठक, जे जे शक्य होईल, ते सर्व करणार, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

शिवसेना आणि भाजपमधील सत्तावाटपाचा तिढा (Shivsena BJP Dispute) अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुरुवारी (31 ऑक्टोबर) आपल्या आमदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे.

सेनेची महत्त्वाची बैठक, जे जे शक्य होईल, ते सर्व करणार, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

मुंबई: शिवसेना आणि भाजपमधील सत्तावाटपाचा तिढा (Shivsena BJP Dispute) अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुरुवारी (31 ऑक्टोबर) आपल्या आमदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेविषयी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे जे शक्य होईल ते सर्व करणार (Uddhav Thackeray on Government Formation) असल्याचं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या या बैठकीत उद्धव ठाकरे पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करतील, असाही अंदाज वर्तवला जात आहे. तसेच शिवसेनेच्या विधानसभा पक्षनेत्याचीही निवड यात केली जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून शिवसेनेच्या आमदारांना फोडण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना एकसंध ठेवणे आणि शिवसेनेच्या अधिकाधिक मागण्या मान्य करुन घेणे यावर देखील उद्धव ठाकरे यांचा भर असणार आहे.

विशेष म्हणजे एकीकडे भाजपच्या गोटातून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह काही मंत्रीपदांची ऑफर दिल्याचं सांगितलं जात असलं, तरी भाजपकडून शिवसेनेशी अद्याप कुठलाही संपर्क साधला नसल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. यातून भाजप दबावतंत्र वापरत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे देखील आक्रमक आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना बोलावत भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दरम्यान, शिवसेनेने आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर आता शिवसेनेचं संख्याबळ 62 वर गेलं आहे.

संबंधित बातम्या : 

शिवसेना-भाजपच्या 6 दिग्गजांचा मंत्रिपदावर डोळा, औरंगाबादमधून कुणाची वर्णी लागणार?

2014 आणि 2019 मध्ये मला संधी दिल्याबद्दल आभार, मी पुन्हा येणार, जोमाने काम करणार : देवेंद्र फडणवीस

शिवसेना-भाजपचा शपथविधी एकत्र होणार का? गिरीश महाजन म्हणतात…

उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे, भाजपची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रिपद नाहीच!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI