AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपक्षांची खेचाखेची, भाजप-शिवसेनेचं संख्याबळ कितीवर?

शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. शिवसेनेला आतापर्यंत 5 अपक्ष आमदारांनी पाठिंबा (Independent MLAs Support) दिला आहे.

अपक्षांची खेचाखेची, भाजप-शिवसेनेचं संख्याबळ कितीवर?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 29, 2019 | 3:42 PM
Share

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. शिवसेनेला आतापर्यंत 5 अपक्ष आमदारांनी पाठिंबा (Independent MLAs Support) दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं (Shiv Sene BJP) संख्याबळ 61 वर पोहोचलं आहे. तर दुसरीकडे भाजपलाही 8 अपक्षांनी पाठिंबा (Shiv Sene BJP) दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 113 जागांवर पोहोचलं आहे.

दोन अपक्षांनी आज भाजपला पाठिंबा दर्शवला. रायगडमधील उरण विधानसभेतील अपक्ष आमदार महेश बालदी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत, पाठिंबा जाहीर केला. याशिवाय गोंदियातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीही भाजपला समर्थन दर्शवलं.

यापूर्वी अपक्ष आमदार गीता जैन, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा, अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, श्यामसुंदर शिंदे आणि रत्नाकर गुट्टे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार

  1. महेश बालदी – उरण
  2. विनोद अग्रवाल- गोंदिया
  3. गीता जैन- मीरा भाईंदर
  4. किशोर जोरगेवार – चंद्रपूर
  5. रवी राणा- बडनेरा, अमरावती
  6. राजेंद्र राऊत – बार्शी
  7. श्यामसुंदर शिंदे – लोहा, नांदेड
  8. रत्नाकर गुट्टे – गंगाखेड, परभणी

शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष, बंडखोर आमदार

  1. रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल
  2. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू
  3. प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल
  4. भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर
  5. नेवासा अपक्ष आमदार शंकरराव गडाख

अद्याप कोणालाही पाठिंबा न दिलेले अपक्ष आमदार

  1. मंजुषा गावित – साखरी, धुळे (भाजप बंडखोर)
  2. चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर, जळगाव (शिवसेना बंडखोर)
  3. प्रकाश आवाडे – इचलकरंजी, कोल्हापूर (काँग्रेस बंडखोर)
  4. राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, (राष्ट्रवादी बंडखोर)
  5. संजय शिंदे – करमाळा, सोलापूर (राष्ट्रवादी बंडखोर)

यांचा कोणाला पाठिंबा?

  1. मनसे – 01
  2. माकप – 01
  3. जनसुराज्य शक्ती – 01
  4. एमआयएम – 02

 कोणालाही बहुमत नाही

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

  • भाजप – 105
  • शिवसेना – 56
  • राष्ट्रवादी – 54
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03
  • प्रहार जनशक्ती – 02
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
  • शेकाप – 01
  • रासप – 01
  • स्वाभिमानी – 01
  • अपक्ष – 13
  • एकूण – 288

महायुती – 162

(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105

(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...