AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने 100 टक्के फसवलं, पण मी 287 जागी मदत करेन, मला गंगाखेडला सहकार्य करा : जानकर

दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत, कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असंही जानकरांनी जाहीर केलं.

भाजपने 100 टक्के फसवलं, पण मी 287 जागी मदत करेन, मला गंगाखेडला सहकार्य करा : जानकर
Mahadev Jankar
| Updated on: Oct 07, 2019 | 2:26 PM
Share

मुंबई : भाजपने आम्हाला शंभर टक्के फसवलं असलं तरी शिवसेना-भाजप महायुतीतून ‘रासप’ बाहेर पडलेली नाही. शिवसेना-भाजपला 287 जागांवर मदत करणार आहोत, परंतु गंगाखेडची एक जागा आम्हाला लढवू द्या, असं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar claims BJP Cheated) यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय. रासपवर अन्याय झाला. आम्हाला महायुतीत दोन जागा सोडल्या. आमच्या चिन्हावर लढण्याचं भाजपने मान्य केलं होतं, पण आम्हाला बी फॉर्म देण्यात आला नाही. भाजपने  आमच्यासोबत धोका केला, असा आरोप जानकर यांनी केला.

आमच्या जिंतूरच्या उमेदवाराचीही चूक आहे की त्यांनी त्यांच्या बी फॉर्म सोबत उमेदवारी अर्ज भरला. दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत, कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असंही जानकरांनी जाहीर केलं.

गंगाखेडला रत्नाकर गुट्टे हे आता आमचे एकमेव अधिकृत उमेदवार आहेत. गंगाखेडची जागा महायुतीत शिवसेनेला सोडली आहे. मात्र तिथे आमचा उमेदवार लढणार आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथून सेनेच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगावं. अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल, असंही जानकर (Mahadev Jankar claims BJP Cheated) म्हणाले.

बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम

आम्ही महायुतीतून बाहेर पडणं बरोबर दिसणार नाही. आम्ही महायुतीचे घटकपक्ष म्हणूनच लढणार आहोत. सर्व जागांवर मी महायुतीला मदत करणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी ‘भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली’ हे केलेलं वक्तव्य बरोबरच आहे. शिवसेना जात्यात आहे आणि मी पण भरडलो गेलो आहे, अशी खंत जानकरांनी व्यक्त केली.

जिंतूर आणि दौंडमध्ये माझे कार्यकर्ते मदत करायची का नाही, तो निर्णय घेतील. गोपीचंद पडळकर हे साधे कार्यकर्ते आहेत, मी एका पक्षाचा प्रमुख आहे. मी राष्ट्रीय नेता आहे. त्यांच्याशी माझी तुलना करणं चुकीचं असल्याचंही जानकर म्हणाले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.