Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या (EVM not working) तक्रारी आहेत. 

EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

EVM not working मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या (EVM not working) तक्रारी आहेत.  अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा (Maharashtra Vidhansabha Election Voting)  हक्क बजावला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, मतदान सुरु झालं असलं, तरी सुरुवातीपासूनच ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी सुरु आहेत. ईव्हीएममध्ये अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे काही ठिकाणी उशिरा मतदान सुरु झालं, तर काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडामुळे मतदानाला व्यत्यय आला.

VOTING LIVE UPDATE

EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

निफाड विधानसभा मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड

निफाड विधानसभा मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड, वैनतेय महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 174 येथील घटना, ईव्हीएम चालू न झाल्याने 1 तासाहून अधिक वेळ मतदान बंद, पर्यायी मशीन आणून मतदानाला सुरुवात, मतदानासाठी मोठी गर्दी

21/10/2019,6:11PM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

जालन्यातील बदनापूर मतदारसंघात व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड

जालन्यातील बदनापूर मतदारसंघात व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड, दहिगव्हान खुर्द येथील घटना, सायंकाळी साडेचार वाजता बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया थांबली, मतदान केंद्रावर गर्दी

21/10/2019,6:09PM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

औरंगाबादेत मतदान यंत्रात बिघाड

गंगापूर तालुक्यातील घोडेगाव इथे मतदान यंत्रात बिघाड मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प गेल्या एक तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प

21/10/2019,12:26PM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 % टक्के मतदान..

मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 % टक्के मतदान..

21/10/2019,12:02PM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

बुलडाणा जिल्हा सकाळी 11 वाजेदरम्यान मतदान

बुलडाणा जिल्हा सकाळी 11 वाजेदरम्यान आकडेवारी 21 मलकापूर – 14.78 22 बुलडाणा – 15.15 23 चिखली – 15.30 24 सिंदखेड राजा – 16.41 25 मेहकर – 16.05 26 खामगांव- 17.98 27 जळगांव जामोद – 15.71 एकूण – 15.91

21/10/2019,11:55AM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

काँग्रेसच्या EVM बिघाडाच्या ६५ लेखी तक्रारी

राज्याच्या विविध भागातून EVM बिघाडाच्या तक्रारी, काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे EVM बिघाडाच्या ६५ लेखी तक्रारी केल्या

21/10/2019,11:48AM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

चाळीसगावात ईव्हीएम बंद

चाळीसगावात ईव्हीएम बंद, सकाळपासून ईव्हीएम बंदची दुसरी घटना, मतदान केंद्र क्र 310 वलठान येथील घटना

21/10/2019,10:51AM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

बुलडाण्यातील देऊळगावात तासभर उशिराने मतदान

सिंदखेड राजा मतदारसंघातीळ देऊळगांव राजा बुथ क्र. 205 मध्ये मतदान सुरू होण्यापूर्वीच बिघाड झाला होता, त्यामुळे तासाभराने मतदान सुरु झाले. येथील मशीन १ तास ४ मिनिटे बंद होती. ८ वाजून ४ मिनिटांनी सुरू झाले मतदान.

21/10/2019,9:38AM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

औरंगाबादेत 3 मतदान केंद्रावर बिघाड

औरंगाबाद जिल्ह्यात तीन मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड,पैठण तालुक्यातील टाकळी अंबड, वाहेगाव आणि वैजापूर तालुक्यातील हिंगोणी मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड, जवळपास एक तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प,तीन मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने प्रक्रिया ठप्प

21/10/2019,9:26AM
EVM not working, Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

इचलकरंजीत VVPAT मध्ये बिघाड

हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील घटना, रुकडी गावातील बूथ क्रमांक 219 मध्ये VVPAT मशीन बंद असल्यामुळे तासाभरापासून मतदान बंद. पावसामुळे हैराण झालेल्या मतदार राजावर परिणाम, त्यामध्ये मतदानाची मशीन बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ

21/10/2019,9:24AM

पुण्यातील शिवाजी नगरमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान

पुणे शिवाजीनगर विद्याभवन मतदारकेंद्रावर बत्ती गुल, मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान सुरु

सांगलीतील इस्लामपूरमध्ये मतदानयंत्रात बिघाड 

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदान केंद्रावर मतदानयंत्रात बिघाड, इस्लामपूर मतदारसंघातील साखराळे गावातील मतदान केंद्र क्रमांक 63 वर मतदान यंत्रात बिघाड, 35 मिनिटे उलटूनही मतदान सुरु नाही

वर्ध्यात ईव्हीएममध्ये बिघाड

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील मतदान केंद्रावर १ तासापासून ईव्हीएम मशिन बंद.  मोहगाव येथील बुथ क्रमांक 50 वरील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, मतदारांची मतदान केंद्राबाहेर लागली रांग, मतदान मशीन बदलण्यासाठी चमू रवाना. हिंगणघाट मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी सहा मशीनच्या व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड. सहाही मशीन बदलण्यात आल्यात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *