राज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी सुरु, राज्यात प्रचारसभांचीही रणधुमाळी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता (MNS Vidhansabha election) वर्तवली जात आहे.

राज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी सुरु, राज्यात प्रचारसभांचीही रणधुमाळी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक (MNS Vidhansabha election) लढणार की नाही याबाबतची सध्या अनेक चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता (MNS Vidhansabha election) वर्तवली जात आहे. या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी कोणती ‘राज’गर्जना करणार याची कार्यकर्त्यांसह सर्वांनाच (MNS Vidhansabha election) उत्सुकता लागून राहिली आहे.

मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब या ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई , अविनाश अभ्यंकर यासह इतर नेतेही उपस्थित आहेत. या मेळाव्यात मनसेच्या उमेदवार चाचपणी आणि अंतिम उमेदवार निश्चित करणार आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे उमेदवार जाहीर करणार असल्याचेही बोललं जातं आहे.

लोकसभा निवडणुकांवेळी राज ठाकरे यांनी मोदी-शाहाविरोधात लाव रे व्हिडीओचे अस्त्र उचलले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मनसे उतरणार असल्याची चर्चा (MNS Vidhansabha election) रंगली आहे. येत्या ऑक्टोबरपासून मनसेच्या प्रचारसभांना सुरुवात होणार आहे. जवळपास 15 प्रचारसभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मनसे 122 जागा लढणार?

यंदाच्या विधानसभेला मनसे उभे राहणार नाही अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर मनसेने (MNS Vidhansabha election) थेट उमेदवारांची चाचपणी सुरु केली होती. यात मनसेने 122 जागांची तयारी केल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिकमधील सर्व जागा मनसे लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील 36 पैकी 36 जागा, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मराठवाडा 42 पैकी 22, विदर्भ 62 पैकी 15, कोकण 15 पैकी 10, उत्तर महाराष्ट्र – चाचपणी सुरु, अशी मनसेने तयारी केली आहे.

राज ठाकरे नेमका काय आदेश देतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सध्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक लढवण्यावरुन उत्साह पाहायला मिळत आहे. सभा, पक्षाची रणनिती, पक्षप्रवेश याबाबत सध्या मलाही काहीही माहित नाही. त्यामुळे मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देऊ शकतं नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिली.

“मनसे आघाडीसोबत जाणार नाही”

विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनसे जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा प्रचाराचा जो झंझावात होता, तो झंझावात आता राज ठाकरे स्वतःच्या पक्षासाठी करताना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबई 36 पैकी 36, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मनसेची 122 जागांची तयारी

अखेर मनसेच्या निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब, जागाही ठरल्या  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *