विरोधकांचे आक्षेप, अध्यक्षांची उत्तरं, ते बहुमत, विश्वासदर्शक ठरावाची A टू Z माहिती

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने विधीमंडळात आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. हा ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांप्रमाणे घेण्यात आला.

विरोधकांचे आक्षेप, अध्यक्षांची उत्तरं, ते बहुमत, विश्वासदर्शक ठरावाची A टू Z माहिती
Follow us
| Updated on: Nov 30, 2019 | 8:28 PM

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने विधीमंडळात आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. हा ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांप्रमाणे घेण्यात आला. मात्र, यावर भाजप नेते आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला ( Open Ballet Floor Test process in Assembly). त्यावर हंगामी (अस्थायी) विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी न्यायालयाने बहुमतासाठी दिलेले विशेष निर्देशच वाजून दाखवले. त्यानंतर वळसे पाटील यांनी या निर्देशांचे काटोकोर पालन करत बहुमत चाचणी घेतली. त्याआधी विधीमंडळ सदस्यांना ही प्रक्रिया देखील समजाऊन सांगण्यात आली ( Open Ballet Floor Test process in Assembly).

बहुमत चाचणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे

1. ज्या सदस्यांना बहुमत प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचं आहे त्यांनी सभागृहात उजव्या बाजूला आपआपल्या जागेवार बसावे. प्रत्येकाला सिट नंबर दिलेले आहे.

2. ज्यांना प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचे आहे त्यांनी सभागृहाच्या डाव्या बाजूला बसावे.

3. तसेच जे सदस्य प्रस्वावाबाबत तटस्थ राहू इच्छितात त्यांनी सभागृहाच्या समोरच्या बाजूला बसावे.

4. प्रस्तावाला मतदान करताना जे अनुकुल असतील त्या सर्व सदस्यांनी उभं राहावं. त्यासाठी त्या सदस्याने जागेवर उभं राहून आपलं नाव आणि अनुक्रमांक उच्चारावा.

दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहातील विधीमंडळ सदस्यांना बहुमत चाचणीची प्रक्रिया समजाऊन सांगितल्यानंतर प्रत्येकाला ही प्रक्रिया पाळण्यास सांगितले. दरम्यान, भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी करत याचा निषेध केला. तसेच सभागृहातून वॉक आऊट केला.

देवेंद्र फडणवीस यांचा बहुमत चाचणीच्या पद्धतीवर आक्षेप

फडणवीस म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय केवळ त्या घटनेसाठी होता. त्यावेळीच खुलं मतदान घ्यायचं होतं, आत्ता नाही. जर 170 आमदारांचा पाठिंबा होता तर मग विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याआधी बहुमत चाचणी का घेतली? सर्व नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरु आहे.”

फडणवीसांच्या आक्षेपाला दिलीप वळसे पाटलांचं सडेतोड उत्तर

वळसे पाटील म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत फडणवीसांनी उल्लेख केला. त्यातील काही भाग आपल्या माहितीसाठी वाचून दाखवतो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पॅरा 27 मध्ये असं म्हटलं घोडेबाजार होऊन स्थिर लोकशाही प्रक्रिया चालण्यासाठी बाधा होईल अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाला अंतरिम निर्देश देण्याचे पूर्ण अधिकार आहेत. सध्याच्या परिस्थितीत शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना बहुमत आहे की नाही बहुमत चाचणी शक्य तितक्या लवकर घेणे आवश्यक आहे. बहुमत चाचणी कशी घ्यायची याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.”

… म्हणून विश्वासदर्शक ठरावादरम्यान अजित पवार जितेंद्र आव्हाडांवर भडकले

विशेष म्हणजे विश्वासदर्शक ठरावादरम्यान प्रत्येक आमदाराच्या आसनाला अनुक्रमांक देण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक आमदाराने विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देण्यासाठी जागेवर उभं राहून आपलं नाव सांगत अनुक्रमांकाचा उल्लेख करायचा होता. मात्र, यावेळी अनेक आमदारांची गल्लत झाली. यात अगदी जितेंद्र आव्हाडांचाही समावेश आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली. ही मोजणी वर्षा एकनाथ गायकवाड यांच्यापर्यंत आली. त्यांनी आपला अनुक्रमांक 14 सांगत नाव सांगितले. त्यानंतर अॅड. के. सी. पाडवी यांनी देखील अनुक्रमांक 15 सांगत नाव सांगितले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा क्रमांक होता. मात्र, त्यांनी आपलं नाव सांगत अनुक्रमांक 16 ऐवजी थेट 20 सांगितला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. स्वतः अजित पवार देखील आव्हाड यांच्यावर भडकले. तसेच तुमचा क्रमांक 20 नसून 16 आहे असं सांगितलं. आव्हाड यांच्या शेजारी हसन मुश्रीफ देखील होते. त्यांनी देखील ही चूक आव्हाडांच्या लक्षात आणून दिली. असाच प्रकार आमदार बालाजी देवसराव कल्याणकर यांच्याबाबतही झाला. त्यांचा अनुक्रमांक 100 असताना त्यांनी 78 असा उच्चार केला. त्यांनाही त्यांच्या शेजारील आमदाराने हे लक्षात आणून दिलं.

आदित्य ठाकरेंचं वेगळेपण

आदित्य ठाकरे यांनी बहुमत चाचणी दरम्यान, आपल्या नावाचा उल्लेख करताना आदित्य रश्मी उद्धव ठाकरे असा केला. त्यानंतर अनुक्रमांक 25 असल्याचं नमूद केलं.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.