शरद पवार EXCLUSIVE : शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात

"शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज किमान समान कार्यक्रम निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल", अशी एक्स्क्लुझिव्ह माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar exclusive on Maharashtra Government formation) यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

शरद पवार EXCLUSIVE : शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात
Follow us
| Updated on: Nov 20, 2019 | 11:16 AM

नवी दिल्ली : “शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज किमान समान कार्यक्रम निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल”, अशी एक्स्क्लुझिव्ह माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar exclusive on Maharashtra Government formation) यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होत आहे. त्याआधी शरद पवार (Sharad Pawar exclusive on Maharashtra Government formation) हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून, महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाची माहिती देणार आहेत.

या सर्व घडामोडी घडत असताना, शरद पवारांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना, शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं.

शरद पवार म्हणाले, “कोण काय बातम्या करतंय यावर मी बोलणार नाही, पण सध्या बातम्या कमी आणि अफवाच जास्त सुरू आहेत. आज नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे. 22 देशातील लोक इथे येतील. याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी यावं, यासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी भेट घेत आहे”

राज्यातील ओल्या दुष्काळात झालेल्या नुकसानीबद्दल मदत मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत शरद पवार म्हणाले, “आज काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची किमान समान कार्यक्रमबाबत चर्चा होईल. तो रिपोर्ट आम्हाला देण्यात येणार आहे”

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार – संजय राऊत

अनेक दिवसांपासून खोळंबलेला सत्तास्थापनेचा (Sanjay Raut says on government) प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटेल आणि शिवसेनेच्या नेतृत्वात एक मजबूत लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसंच उद्यापर्यंत (21 नोव्हेंबर) सत्तेचं चित्र स्पष्ट होईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी (Sanjay Raut says on government) मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, याचाही पुनरुच्चार केला.

शरद पवारांना भाजपची ऑफर?

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना, भाजपने मेगाप्लॅन केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपने थेट राष्ट्रपतीपदाची (BJP offer president post to Sharad Pawar) ऑफर दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी करावी यासाठी शरद पवारांवर राष्ट्रवादीच्याच दोन खासदारांचा दबाव आहे. शिवाय अजित पवारांचेही मन वळवण्याचे प्रयत्न या दोन खासदारांकडून सुरु आहेत. भाजपसोबत सत्तेत गेल्यास, केंद्रात तीन मंत्रिपदे, राज्यातील सत्तेत मोठा वाटा आणि जुलै 2022 मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद असा फॉर्म्युला भाजपने राष्ट्रवादीला ऑफर केल्याची माहिती, टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केली आहे.

संबंधित बातम्या

भाजपचा मास्टरस्ट्रोक, पवारांना थेट राष्ट्रपतीपदाची ऑफर, केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद देण्याचीही तयारी-सूत्र  

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार : संजय राऊत 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.