मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड नाही, भाजपकडून लेखी आश्वासनासाठी शिवसेना आक्रमक

शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद (shiv sena Chief Minister ) मागितलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड नाही, भाजपकडून लेखी आश्वासनासाठी शिवसेना आक्रमक

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजप 105 जागांसह मोठा पक्ष ठरला तर शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेने (shiv sena Chief Minister ) भाजपला 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करुन देत, मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद (shiv sena Chief Minister ) मागितलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. नवनिर्वाचित आमदारांनी सत्तेतील निर्णयाबाबतचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना दिले. मात्र उद्धव ठाकरेंनीही निर्णय आमदारांकडे सोपवला.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर आले होते. तेव्हा त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या सत्तास्थापनेचा 50-50 फॉर्म्युला ठरला होता. म्हणजे 144-144 जागा वाटपाचे सूत्र होते. पण भाजपची जागावाटपावेळी अडचण समजून घेतली. पण आता सत्तेत 50 टक्के वाटा हवा, भाजप नेत्यांनी ते आम्हाला लेखी मान्य करावं, म्हणजे भविष्यात कुठली अडचण किंवा वाद होणार नाहीत. हिंदुत्वाच्या आधारावर युती आहे, त्यामुळे युतीचे सरकार स्थापन व्हावे, अन्य उपलब्ध पर्यायांचा विचार करायला लागू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक सुमारे 1 तास चालली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

शिवसेना आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केलीय की जोपर्यंत भाजप 50-50 फॉर्म्युल्यानुसार भाजपचे वरिष्ठ नेते लिहून देत नाहीत, तोपर्यंत सरकार स्थापनेचा निर्णय होणार नाही, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

Published On - 3:12 pm, Sat, 26 October 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI