चौथ्या लिस्टमध्ये नाव नसलं की कसं वाटतं? विद्यार्थ्यांचे तावडेंना शालजोडे

आपल्याला झालेला त्रास आता शिक्षणमंत्र्यांना कळला असेल, याबद्दल काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तर कोणी थेट शिक्षणमंत्र्यांना 'नापास' असा शेरा दिला.

चौथ्या लिस्टमध्ये नाव नसलं की कसं वाटतं? विद्यार्थ्यांचे तावडेंना शालजोडे

मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या जाहीर करत 150 उमेदवार जाहीर केले आहेत. विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ‘चौथ्या लिस्टमध्येही नाव आलं नाही, की विद्यार्थ्यांना कसं वाटतं, हे समजलं असेल’ असं म्हणत विद्यार्थ्यांनी (Students Taunt Vinod Tawde) सोशल मीडियावरुन शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर तोंडसुख घेतलं आहे.

शालेय शिक्षण मंत्रालयाची धुरा हाती घेतल्यापासून विनोद तावडे यांच्या कारभारावर विद्यार्थी नाराज होते. अॅडमिशन प्रक्रियेतील दिरंगाई आणि एकूणच पद्धतीवरुन विद्यार्थी आपला संताप सोशल मीडियावर वारंवार व्यक्त करत आले आहेत. त्यानंतर विनोद तावडेंची उचलबांगडी करत आशिष शेलारांकडे शालेय शिक्षण मंत्रालय सुपूर्द करण्यात आलं होतं.

विनोद तावडेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे आधीपासूनच त्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा होती. त्यातच दुसऱ्या, तिसऱ्या यादीतही त्यांना स्थान न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरुन तावडेंना वाकुल्या दाखवल्या. आता भाजपच्या कदाचित शेवटच्या यादीतही त्यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांना डावललं गेल्याबद्दल शिक्कामोर्तब झालं आहे.

‘चौथ्या लिस्टमध्येही नाव आलं नाही, की विद्यार्थ्यांना कसं वाटतं, हे समजलं असेल’ असं म्हणत विद्यार्थ्यांनी (Students Taunt Vinod Tawde) सोशल मीडियावरुन आपली दुखरी नस उलगडून दाखवली आहे. आपल्याला झालेला त्रास आता शिक्षणमंत्र्यांना कळला असेल, याबद्दल काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तर कोणी थेट शिक्षणमंत्र्यांना ‘नापास’ असा शेरा दिला.

शालेय शिक्षण विभागातील कार्यपद्धतीवर असलेली नाराजी, विनोद तावडे यांच्या डिग्रीवरुन उफाळलेलं वादळ, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत होणारी दिरंगाई यासारखी अनेक कारणं विनोद तावडेंना तिकीट न मिळण्यामागे असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

खडसे, तावडे, मेहतांचा पत्ता कट, मुक्ताईनगरमधून खडसेंची कन्या, भाजपची चौथी यादी

विनोद तावडे यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे. प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा, एकनाथ खडसे यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे, तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *