नवे आहेत पण छावे आहेत, राजकीय घराण्यांची युवा पिढी मैदानात

राजकारणासाठी घराणेशाही नवीन नाही. विधानसभा निवडणुकीत नशिब आजमावणाऱ्या युवा वारसदारांचा आढावा

नवे आहेत पण छावे आहेत, राजकीय घराण्यांची युवा पिढी मैदानात
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:09 AM

मुंबई : डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता याच न्यायाने राजकीय नेत्यांची मुलंही राजकारणात जाण्याची प्रथा नवीन नाही. ठाकरे, पवार, मुंडे, महाजन, विखे पाटील, मोहिते पाटील ही राजकारणातील मोठी घराणी आहेत. घराणेशाहीला अनुसरुन त्यांच्या दुसऱ्या पिढ्या राजकारणात आल्या होत्या. आता ठाकरे-पवारांच्या तिसऱ्या पिढीने (Young Members of Political Families) संसदीय राजकारणात पाऊल ठेवलं आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चार नातवंडं आपलं नशीब आजमावणार आहेत. त्यापैकी दोघं आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या अध्यक्षांची नातवंडं. अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार.

आदित्य ठाकरे वरळीतून नशिब आजमावणार आहेत. त्यांच्याविरोधात आघाडीचे सुरेश माने रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंसाठी ही लढाई तुलनेने सोपी मानली जाते.

रोहित पवार यांच्यासाठी ही लढाई चुरशीची आहे, तशी प्रतिष्ठेचीही. चुलत भाऊ पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत पाहाव्या लागलेल्या पराभवाची किनार याला आहेच. सोबतच भाजपचे मंत्री राम शिंदे विरोधात असल्यामुळे रोहित पवार यांना विधानसभेत पाऊल ठेवण्यासाठी जीवाचं रान करावं लागेल.

तिसरे नातू आहेत शिक्षण सम्राट डी. वाय. पाटील यांचे. अर्थात ऋतुराज पाटील. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ते भाजपच्या अमल महाडिक यांच्याविरोधात मैदानात आहेत. ऋतुराज पाटील यांच्यासाठीही ही लढाई सोपी नाही.

चौथे नातू आहेत ते सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिल देशमुख. 94 वर्षीय आजोबा गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचला आहे. यंदाही आबासाहेबांसाठी मतदारसंघातून नारा घुमला होता. त्यामुळे आजोबांच्या पुण्याईवर नातवासाठी वाट सोपी आहे.

याशिवाय भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत कन्या रोहिणी खडसे यांना त्याच म्हणजे जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. याआधी, खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसेही जळगावातून खासदारपदी निवडून आल्या आहेत.

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र (Young Members of Political Families) यंदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. धीरज देशमुख लातूर ग्रामीण, तर अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

विक्रमगडचे आमदार विष्णू सावरा यांच्या प्रकृतीमुळे पुत्र हेमंत सावरा यांना त्याच मतदारसंघातून भाजपने तिकीट दिलं आहे. तर सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे राष्ट्रवादीच्या तिकीटावर श्रीवर्धनमधून नशिब आजमावणार आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना उतरवलं आहे.

बीडमधील बलाढ्य क्षीरसागर कुटुंबाचे वारसदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीकडून बीड विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीतूनच शिवसेनेत गेलेले काका जयदत्त क्षीरसागर यांचं आव्हान आहे.

पहिल्यांदा नशीब आजमावणारे युवा वारसदार

आदित्य ठाकरे (शिवसेना) – उद्धव ठाकरे यांचे पुत्र – वरळी, मुंबई रोहित पवार (राष्ट्रवादी) – शरद पवार यांचे नातू – कर्जत जामखेड, अहमदनगर हेमंत सावरा (भाजप) – आमदार विष्णू सावरा यांचे पुत्र – विक्रमगड, पालघर आदिती तटकरे (राष्ट्रवादी) – सुनिल तटकरे यांची कन्या – श्रीवर्धन, रायगड संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) – क्षीरसागर कुटुंबाचे वारसदार – बीड, बीड ऋतुराज पाटील (काँग्रेस) – डी वाय पाटील यांचे नातू – कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर अनिल देशमुख (शेकाप) – गणपतराव देशमुख यांचे नातू – सांगोला, सोलापूर रोहिणी खडसे (भाजप) – एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी – मुक्ताईनगर, जळगाव धीरज देशमुख (काँग्रेस) – विलासराव देशमुख यांचे पुत्र – लातूर ग्रामीण, लातूर निलय नाईक (राष्ट्रवादी) – मनोहर नाईक यांचे पुत्र – पुसद, यवतमाळ श्रीनिवास वनगा (शिवसेना) – दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र – पालघर, पालघर

आतापर्यंतची घराणेशाही (Young Members of Political Families)

देवेंद्र फडणवीस (भाजप)- नागपूर दक्षिण पश्चिम – काकी शोभाताई फडणवीसयुतीच्या 95 च्या राजवटीत कॅबिनेट मंत्री पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)- नांदगाव (नाशिक) – वडील छगन भुजबळ येवलामधून उमेदवार अमित देशमुख (काँग्रेस) – लातूर शहर – विलासराव देशमुख यांचे पुत्र संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) – निलंगा – माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू, तर शिवाजीरावांचे दुसरे पुत्र अशोक पाटील निलंगेकर काँग्रेसतर्फे त्याच मतदारसंघात अजित पवार (राष्ट्रवादी) – बारामती – शरद पवार यांचे पुतणे अशोक चव्हाण (काँग्रेस) – भोकर, नांदेड – माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र प्रणिती शिंदे (काँग्रेस) – सोलापूर शहर मध्य – माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या पंकजा मुंडे (भाजप) परळी, बीड – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या, विरोधात चुलत भाऊ धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) नितेश राणे (भाजप) – कणकवली – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र योगेश कदम (शिवसेना) – खेड – शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम (काँग्रेस) – पलुस कडेगाव, सांगली – माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) – आंबेगाव, पुणे – माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – शिर्डी – बाळासाहेब विखे पाटील यांचे पुत्र संतोष रावसाहेब दानवे (भाजप) – भोकरदन, जालना – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र राहुल नार्वेकर (भाजप) – कुलाबा, मुंबई – रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई निर्मला गावित (शिवसेना) – इगतपुरी – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची कन्या

खासदार वारसदार

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) – बारामती – शरद पवार यांची कन्या रक्षा खडसे (भाजप) – जळगाव – एकनाथ खडसे यांची सून सुजय विखे पाटील (भाजप) – अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र हीना गावित (भाजप) – नंदुरबार – भाजप उमेदवार विजयकुमार गावित यांची कन्या

संबंधित बातम्या :

विधानसभेची आयपीएलसारखी स्थिती, उमेदवार तोच, फक्त पक्ष वेगळा!

विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्रातील 40 लक्षवेधी लढती

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.