विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्रातील 40 लक्षवेधी लढती

काही लढती एकतर्फी मानल्या जात आहेत, तर विद्यमान आमदारांना चॅलेंज देणारा प्रतिस्पर्धी तितकाच तगडा असल्यामुळे काही ठिकाणच्या लढती लक्षवेधी झाल्या आहेत. 

विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्रातील 40 लक्षवेधी लढती

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झालेली आहे. सर्व 288 मतदारसंघातील चित्र (Maharashtra Assembly 2019 Big Fights) आता स्पष्ट झालं आहे. 7 ऑक्टोबर ही (Maharashtra Assembly election 2019) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणाकोणाची लढत रंगणार हे समोर आलं आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी असं चित्र या निवडणुकीत असल्याने अनेक मतदारसंघात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत.

भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, शिवसंग्राम यांची महायुती तर काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बविआ, सपा, आरपीआय कवाडे, शेकाप अशी महाआघाडी आहे. काही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, मनसे यांचे तगडे प्रतिस्पर्धी मैदानात उतरल्यामुळे लढती तिरंगी होण्याची शक्यता आहे.

काही लढती एकतर्फी मानल्या जात आहेत, तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहणार आहे. विद्यमान आमदारांना चॅलेंज देणारा प्रतिस्पर्धी तितकाच तगडा असल्यामुळे काही ठिकाणच्या लढती लक्षवेधी (Maharashtra Assembly 2019 Big Fights) झाल्या आहेत.

विधानसभा निवडणूक 2019 मधील लक्षवेधी लढती (Maharashtra Assembly 2019 Big Fights)

 नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर

देवेंद्र फडणवीस (भाजप) vs आशिष देशमुख (काँग्रेस) – नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर

परळी, बीड

पंकजा मुंडे (भाजप) vs धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – परळी, बीड

बीड, बीड

जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) – बीड, बीड

कर्जत जामखेड, अहमदनगर

राम शिंदे (भाजप) vs रोहित पवार (राष्ट्रवादी) – कर्जत जामखेड, अहमदनगर

कराड दक्षिण, सातारा

पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) vs अतुल भोसले (भाजप) – कराड दक्षिण, सातारा

कणकवली, सिंधुदुर्ग

नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना) – कणकवली, सिंधुदुर्ग

दिंडोशी, मुंबई

सुनील प्रभू (शिवसेना) vs विद्या चव्हाण (राष्ट्रवादी) – दिंडोशी, मुंबई

अणुशक्तीनगर, मुंबई

तुकाराम काते (शिवसेना) vs नवाब मलिक (राष्ट्रवादी) – अणुशक्तीनगर, मुंबई

वर्सोवा, मुंबई

भारती लव्हेकर (भाजप) vs बलदेव खोसा (काँग्रेस) vs राजुल पटेल (शिवसेना बंडखोर) – वर्सोवा, मुंबई

मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई

विठ्ठल लोकरे (शिवसेना) vs अबू आझमी (समाजवादी पक्ष) – मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई

वांद्रे पूर्व, मुंबई

विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) vs तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर) – वांद्रे पूर्व, मुंबई

माहिम, मुंबई

सदा सरवणकर (शिवसेना) vs प्रविण नाईक (काँग्रेस) vs संदीप देशपांडे (मनसे) – माहिम, मुंबई

भायखळा, मुंबई

वारिस युसूफ पठाण (एमआयएम) vs यामिनी जाधव (शिवसेना) vs मधुकर चव्हाण (काँग्रेस) vs गीता गवळी
(अभासे) vs एजाज खान (अपक्ष) – भायखळा, मुंबई

कळवा मुंब्रा, ठाणे

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) vs दीपाली सय्यद (शिवसेना) – कळवा मुंब्रा, ठाणे

उल्हासनगर, ठाणे

कुमार आयलानी (भाजप) vs ज्योती कलानी (राष्ट्रवादी) – उल्हासनगर, ठाणे

ठाणे, ठाणे

संजय केळकर (भाजप) vs अविनाश जाधव (मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबा) – ठाणे, ठाणे

नालासोपारा, पालघर

क्षितीज ठाकूर (बविआ) vs प्रदीप शर्मा (शिवसेना) – नालासोपारा, पालघर

बारामती, पुणे

अजित पवार (राष्ट्रवादी) vs गोपीचंद पडळकर (भाजप) – बारामती, पुणे

कोथरुड, पुणे

चंद्रकांत पाटील (भाजप) vs किशोर शिंदे (मनसे- आघाडीचा पाठिंबा) – कोथरुड, पुणे

नांदगाव, नाशिक

सुहास खांडे (शिवसेना) vs पंकज भुजबळ (राष्ट्रवादी) – नांदगाव, नाशिक

येवला, नाशिक

संभाजी पवार (शिवसेना) vs छगन भुजबळ (राष्ट्रवादी) – येवला, नाशिक

नाशिक पूर्व, नाशिक

राहुल ढिकळे (भाजप) vs बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा – नाशिक पूर्व, नाशिक

मुक्ताईनगर, जळगाव

रोहिणी खडसे (भाजप) vs चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत) – मुक्ताईनगर, जळगाव

साकोली, भंडारा

परिणय फुके (भाजप) vs नाना पटोले (काँग्रेस) – साकोली, भंडारा

पुसद, यवतमाळ

निलय नाईक (भाजप) vs इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी) – पुसद, यवतमाळ

Maharashtra Assembly 2019 Big Fights

भोकर, नांदेड

बापूसाहेब गोर्टेकर (भाजप) vs अशोक चव्हाण (काँग्रेस) – भोकर, नांदेड

सिल्लोड, औरंगाबाद

अब्दुल सत्तार (शिवसेना) vs खैसर आझाद (काँग्रेस) – सिल्लोड, औरंगाबाद

फुलंब्री, औरंगाबाद

हरिभाऊ बागडे (भाजप) vs कल्याण काळे (काँग्रेस) – फुलंब्री, औरंगाबाद

सोलापूर शहर मध्य, सोलापूर

प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs दिलीप माने (शिवसेना) – सोलापूर शहर मध्य, सोलापूर

पंढरपूर, सोलापूर

सुधाकरराव परिचारक (भाजप) vs भारत भालके (राष्ट्रवादी) – पंढरपूर, सोलापूर

श्रीवर्धन, रायगड

अदिती तटकरे (राष्ट्रवादी) vs विनोद घोसाळकर (शिवसेना) – श्रीवर्धन, रायगड

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी) – सावंतवाडी, सिंधुदुर्ग

कुडाळ, सिंधुदुर्ग

वैभव नाईक (शिवसेना) vs चेतन मोंडकर (काँग्रेस) कुडाळ, सिंधुदुर्ग

शिर्डी, अहमदनगर 

राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) vs सुरेश थोरात (काँग्रेस) – शिर्डी, अहमदनगर 

अहमदनगर शहर, अहमदनगर

संग्राम जगताप (राष्ट्रवादी) vs श्रीपाद छिंदम (बसप) – अहमदनगर शहर, अहमदनगर

सातारा, सातारा

शिवेंद्रराजे भोसले (भाजप) vs दीपक पवार (राष्ट्रवादी) – सातारा, सातारा

माण, सातारा

जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) – माण, सातारा

कागल, कोल्हापूर

हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) vs समरजीत घाटगे (अपक्ष बंडखोर) vs संजय घाटगे (शिवसेना) – कागल, कोल्हापूर


कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर

अमल महाडिक (भाजप) vs ऋतुराज पाटील (काँग्रेस) – कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर

गंगाखेड, परभणी

विशाल कदम (शिवसेना) vs रत्नाकर गुट्टे (रासप) vs डॉ. मधूसुदन केंद्रे (राष्ट्रवादी) – गंगाखेड, परभणी

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील सर्व लढती, तुमच्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार?

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI